Alert : इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. साहजिकच वापरकर्ते आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे फॉलोअर्स वाढवण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स फॉलो करतात. परंतु, प्रत्येकवेळी या टिप्स बरोबर असतीलच असे नाही.
काहीजण फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात चुका करतात आणि या चुका त्यांच्या अंगलट येतात. काहीजणांना तर यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जर तुम्हीही अशा चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा नाहीतर तुमचेही नुकसान होऊ शकते.

याकडे द्या लक्ष
बनावट फॉलोअर्स घेणे
अनेकजण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी खूप मेहनत घेतात. सध्याच्या काळात काहीजण शॉर्टकट घेतात. यातील काही लोक फॉलोअर्स वाढवण्यासाठी बनावट पद्धतींचा वापर करतात. परंतु तुम्ही असे करू नका. कारण फसवणूक करणारे टार्गेट फसवतात.
अॅप्सवर पैसे खर्चू नका
कधीही चुकूनही फॉलोअर्स वाढवण्यासाठी अॅप्सवर पैसे खर्च करू नका. कारण येथील गुंतवणूक सुरक्षित नसते. काही बनावट अॅप्स तुमच्याकडून पैसे घेतात आणि फॉलोअर्स वाढवत नाहीत. त्यामुळे पैसे खर्च करण्यापूर्वी विचार करा.
लॉग इन करू नका
अनेकजण बनावट अॅप्सवर नकळत लॉग इन करतात. तुमचे सोशल मीडिया खाते ज्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरवरून लॉग इन केलेले असते. जर तुम्ही असे केले तर हे अॅप तुम्हाला तुमचे चॅनल ऍक्सेस करण्याची परवानगी मागते. आणि येथेच तुमची फसवणूक होते.
लिंकवर क्लिक करू नका
100% फॉलोअर्स वाढवतील अशा लोकांच्या संपर्कात काही जण येतात. ते लोक तुम्हाला फॉलोअर्स मिळवून देण्यासाठी एक लिंक पाठवतात. परंतु, जर तुम्ही त्यावर क्लिक केले तर तुमचे खाते रिकामे होऊ शकते.