Vastu Tips : काहीजणांना भेटवस्तू देण्याची खूप सवय असते. लग्नसमारंभ, वाढदिवस किंवा इतर काही कार्यक्रम असो त्या दिवशी भेटवस्तू दिले जाते. परंतु, या भेटवस्तू देत असताना किंवा भेटवस्तू घेत असताना काळजी घ्या. कारण वास्तुशास्त्रांच्या मतानुसार काही वस्तू कधीच कोणाला देऊ नये.
जरी आपला शत्रू का असेना त्याला या वस्तू देऊ नये. कारण जर असे झाले तर समोरच्या व्यक्तीलाही याचा खूप मोठा फटका बसू शकतो आणि त्याच्यासोबत आपल्यालाही खूप मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे काही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ नका.

वास्तुशास्त्रांच्या मतानुसार, चुकूनही काही गोष्टी कोणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नये तसेच म्हणूनही घेऊ नयेत. जर तुम्ही असे केले तर तुम्ही तुमचे आणि समोरच्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते.
देऊ नका या वस्तू
१. चाकू, तलवार किंवा धारदार वस्तू
चाकू, तलवार किंवा धारदार वस्तू सारख्या तीक्ष्ण वस्तू कधीही भेट देऊ नये. अशा भेटवस्तू घेतल्याने घेणार्याचे दुर्दैव होते. त्यामुळे अशा वस्तू कोणाला देऊ नयेत.
२. घड्याळ
अनेकजण घड्याळ भेट म्हणून देतात. जर तुम्ही असेल केले तर ते अशुभ ठरू शकते. घड्याळ हा बुध ग्रहाचा कारक मानला जातो. जेव्हा तुम्ही एखाद्याला घड्याळ देता तेव्हा तुम्ही तुमच्या भाग्याची संपत्ती त्याला देता, असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा ते घड्याळ थांबते तेव्हा भेटवस्तू घेणार्या व्यक्तीच्या वाईट काळाला सुरुवात होते.
3. फिश एक्वैरियम
फिश एक्वैरियम हे एक प्रकारचे पाणी आहे जे कधीही कोणालाही भेट म्हणून देऊ नका. जर तुम्ही असे केले तर तुम्ही तुमची समृद्धी आणि लक्ष्मी कायमची गमावू शकता. त्यामुळे वास्तुशास्त्रांनी मत्स्यालयांना भेटवस्तू देण्यास मनाई केली आहे.
४. पान
तंत्र-मंत्रात सुपारीला एक विशेष महत्त्व आहे. इतरांवर वशिकरण किंवा इतर तंत्राचा वापर करण्यासाठी सुपारीचा वापर करतात. त्यामुळे कधीही कोणाला भेट म्हणून पान देऊ नका. जर तुम्ही असे केले तर दोघांसाठी चांगले नसेल.