PAN-Aadhaar Link : आज जवळपास प्रत्येक जणांकडे पॅन कार्ड आहे. आर्थिक व्यवहारासाठी ते खूप गरजेचे आहे. जर तुम्हीही पॅन कार्ड वापरत असाल तर बातमी शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.
जर तुम्ही अजूनही पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक केले नसेल तर लगेच करा. कारण लिंक करण्याची 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. यापूर्वी हे काम करा. नाहीतर नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.

देण्यात आला इशारा
याबाबत आयकर विभागाने ट्विट करून इशारा दिलेला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, “आयकर कायदा 1961 नुसार, सर्व पॅन धारकांना, जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत, त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर त्यानंतर म्हणजे एप्रिलपासून 1, 2023 पासून तुमचे पॅन चालणार नाही. त्यामुळे ते आजच लिंक करा.”
लिंक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
- तुम्हाला सर्वप्रथम आयकर ई-फायलिंग पोर्टल https://incometaxindiaefiling.gov.in/S या वेबसाइटवर जावे लागेल.
- तेथे तुम्हाला नोंदणी करावी लागेल(आधी केली नसल्यास). तुमचा पॅन हा तुमचा यूजर आयडी असेल.
- त्यानंतर यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करावे लागेल.
- तुमच्यासमोर एक एक पॉप-अप विंडो दिसेल, जी तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक करा असे सांगेल.
- त्यानंतर तुम्हाला पॅन तपशीलानुसार नाव, जन्मतारीख आणि लिंग यासारखे तपशील प्रविष्ट करावे लागतील.
- तुमच्या आधार तपशीलासह स्क्रीनवर पॅन तपशील सत्यापित करा.
- जर तपशील जुळत असेल तर, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि “आता लिंक करा” बटणावर क्लिक करा.
- सगळ्यात शेवटी तुमच्या स्क्रीनवर एक पॉप-अप मेसेज दिसेल की तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे.