Fake Sugar : सध्याच्या काळात महागाई खूप वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खूप मोठा फटका बसत आहे. याचाच फायदा काही विक्रेते घेत आहेत. सगळ्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये ते भेसळ करत आहेत.
विशेषतः साखरेतही मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. तुम्हीही बनावट साखर खात नाही ना? खरी आणि बनावट साखर कशी ओळखायची ते अगदी सोप्या पद्धतीने जाणून घ्या.
साखरेत युरियाची भेसळ होत असून तुम्हाला जर खरी साखर ओळखायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हातात थोडी साखर घ्यावी लागेल. त्यानंतर ती तुमच्या तळहातावर चोळा.
जर तुमच्या हातात असलेल्या साखरेला अमोनियाचा वास येत असेल तर साखरेत भेसळ झाली आहे, असे समजावे. त्याचबरोबर पाण्यात साखर मिसळून तुम्ही ती साखर खरी की नकली ओळखू शकता.
जर साखर पाण्यात मिसळल्यानंतर तिला अमोनियाचा वास येत असेल तर साखरेची भेसळ झाली आहे असे समजावे. जर तुम्हाला अमोनियाचा वास येत नसेल तर साखरेची भेसळ झाली नाही, असे समजावे.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे साखरेत प्लास्टिकचे कणही मिसळले जात आहेत. हे ओळखण्यासाठी तुम्हाला प्रथम एका ग्लासमध्ये साखर आणि पाणी मिसळावे लागेल. ते पाणी 5 मिनिटांनी चाळून घ्या. जर त्या साखरेत प्लास्टिकचे कण असतील तर ते तुम्हाला फिल्टर केल्यानंतर दिसेल.
त्यामुळे जर बनावट साखर खात असाल तर आजपासून ती खाणे टाळा. कारण या बनावट साखरेमुळे तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊन तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.