तुम्हालाही पाठदुखीचा त्रास आहे का? मग करा ‘हे’ घरगुती ५ उपाय

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Health news :- रोजच्या दैनंदिन जीवनात कामाच्या व्यापातून शरीराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, रोज एका जागेवर बसून काम केल्याने पाठदुखीसारखे आजार उद्भवतात. यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपाय करून पहा.

१. आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये ब्रोकोलीचा समावेश केला तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई व्यतिरिक्त अनेक पोषक घटक हे ब्रोकोलीमध्ये असतात. त्यामुळे आपण ब्रोकोली अनेक प्रकारे आहारात समावेश करू शकता.

२. आपल्या शरीरातील प्रथिने, फायबर किंवा इतर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेकदा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. या पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी सुका मेवा खाणे फायदेशीर आहे. मात्र, सुका मेवा हा नेहमी रात्री भिजवून ठेऊन सकाळी खाणे आवश्यक आहे.

३. सब्जा आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतो. हिवाळा सोडून आपण आपल्या आहारामध्ये नेहमीच सब्जाचा समावेश करावा. सब्जा रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.

४. शरीरात ओमेगा-३ फॅटी अॅसिडची कमतरता असल्यामुळे थकवा आणि शरीराच्या काही भागात वेदना होऊ शकतात. यामुळे बऱ्याच वेळा पाठीत देखील वेदना होतात. ओमेगा-३ फॅटी अॅसिड युक्त मासांचा आहारात समावेश करा.

५.परंतु हे घरगुती उपाय करणे प्राथमिक स्वरूपात ठिक आहे, पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात पाठदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe