तुमच्याकडे व्होडाफोन-आयडियाचा फोन आहे का? मग ही बातमी वाचा…

Published on -

 vodafone idea:व्होडाफोन आयडिया या मोबाईल कंपनीवर इंडस टॉवर्सचे जवळपास ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड लवकरात लवकर न केल्यास टॉवर्सचा ऍक्सेस दिला जाणार नाही, असा इशारा इंडस टॉवर्सनं दिला आहे.

त्यामुळे नोव्हेंबरपासून कंपनीचं नेटवर्क बंद होऊ शकते. तसे झाल्यास २५.५ कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इंडस टॉवर्सच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली.

यावेळी कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल चर्चा झाली. बैठकीनंतर इंडस टॉवर्सकडून व्होडाफोन आयडियाला एक पत्र देण्यात आले. नोव्हेंबरपर्यंत कर्जाची परतफेड करा.

अन्यथा टॉवर्सचा ऍक्सेस मिळणार नाही, असा इशाराच पत्रातून देण्यात आला. आधीच तोट्यात असलेली ही कंपनी इतक्यात कर्जफेड करू शकणार नाही. त्याचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe