‘ह्या’ शेतीबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या, होऊ शकते कोटींची कमाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- सध्या युवकांचा कल नोकरीपेक्षा व्यवसायाकडे आहे. या लोकांसाठी शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिकतेचा वापर करून तरुण लाखो रुपये कमावू शकतात.

युवक सागवानाच्या झाडापासून हवे असल्यास ते कोट्यवधींची कमाई करू शकतात. एक एकर सागवान 1 कोटी रुपयांच्या लागवडीतून सहज मिळवता येते. चला जाणून घेऊयात त्याबद्दल –

 साग लागवड दोन पद्धतीने करता येते. 1) सागजडी लावून, 2) पिशवीतील रोपांची लागवड करून.

सागजडी लावून लागवड करताना रोपवाटिकेतून रोपे काढून सागजडी तयार केल्यानंतर शक्‍यतो लगेच लागवड करावी. जडी तयार केल्यापासून आठ ते दहा दिवसांतच लावावी.

सागाची जडी लावताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीत जोवर ऊब आहे, तोवरच लागवड करावी. लागवड करताना प्रथम लागवड क्षेत्रात पहारीने जडीच्या उंचीची छिद्रे करावीत. खोडाचा भाग जमिनीच्या वर ठेवून मुळांचा भाग जमिनीत लावावा. नंतर आजूबाजूची माती पक्की दाबावी. सागजडीच्या तळाशी आणि आजूबाजूस पोकळी राहून पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.

सागाची शेती फायद्याची :- सागाचे लाकूड हे बांधकामासाठी सर्वात मजबूत समजले जाते. यामुळे घरातीलp लाकूडसामानापासून ते अगदी घराच्या वाशापर्यंत या सागाच्या लाकडाला सर्वाधिक मागणी मिळते.

सागवानाचे गुणधर्म : सागाचे विशेष गुणधर्मामुळे चंदनानंतर सागाचे लाकूड मुल्यवान आहे. हे लाकूड अतिशय टिकाऊ आहे. वाळवी, बुरशी व हवामानाचा या लाकडावर परिणाम होत नाही. हे लाकूड दुभागत नाही. भेगा पडत नाहीत. लाकडावर काहीही परिणाम होत नाही. अनेक कामांसाठी या लाकडाचा उपयोग होतो.

अनेक शतके या लाकडाचा उपयोग जहाजाचे बांधकामात होतो. सागाच्या झाडाचे औषधी गुणधर्म आहेत. फुलांचा उपयोग पित्त, ब्रांकायटीस व लघवीचे विकारावर होतो. बियामुळे लघवी साफ होते. पानातील अर्कामुळे क्षयरोगाचे सूक्ष्म जंतू वाढण्यास प्रतिबंध होतो. पानापासून लाल किंवा पिवळा रंग मिळतो.

त्याचा उपयोग सुती, रेशीम व लोकरीचे कापड रंगविण्यासाठी होतो. सागाची पाने फार मोठी असल्याने त्यापासून पत्रावळ्या व द्रोण बनविता येतात.

शिवाय या पानापासून भाताचे शेतात काम करणारे मजूर पावसापासून स्वसंरक्षणासाठी ‘इरले’ तयार करतात. झोपडी साकारण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. सालीची औषधी उपयोग ब्रान्कायटीसमध्ये होतो. सालीपासून ऑक्झालीक अॅसिड वेगळे काढतात. लाकडाच्या भुशापासून प्रभावित कोळसा बनवितात.

कमाई – शेतकऱ्यांना सागवानाच्या झाडापासून हवे असल्यास ते कोट्यवधींची कमाई करू शकतात. उदाहरणार्थ, जर एका शेतकऱ्याने एका एकरात 500 सागवान झाडे लावली तर 12 वर्षांनंतर तो सुमारे एक कोटी रुपयांना विकू शकतो.

बाजारात 12 वर्षांच्या सागवानाच्या झाडाची किंमत 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत आहे आणि कालांतराने त्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एक एकर लागवडीतून एक कोटी रुपये आरामात मिळू शकतात

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe