अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- आधुनिक आहाराने अनेक व्याधींना जन्म दिला. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयराेग, मधुमेह आणि तणाव, ज्यामुळे आपलं जीवन दुर्धर झाले आहे. यास जबाबदार इतर काेणी नसून आपणच आहाेत.
कारण आपण चवीचे गुलाम झालाे आहाेत. आजारी पडल्यानंतर जेव्हा आपण डाॅक्टरांकडे जाताे, तेव्हा सगळ्यात आधी नियंत्रण ठेवण्यास डाॅक्टर सांगतात.आज आपल्याला प्रत्येक गाेष्ट झटपट हवी आहे, त्यापैकीच एक म्हणजेफास्टफुड.फास्टफुडमुळे आपला स्वादिष्ट आणि आराेग्यदायक देशी आहार दूषित झालाय.
यामुळे आपण आजारी आणि आळशी बनताेय. याफास्टफुडसंस्कृतीला बघता, आपल्या देशात एक अत्यंत उपयु्नत धार्मिक परंपरा आहे, ज्यास उपवास किंवा व्रत असं म्हणतात. छान लागतं म्हणून आपण पाेटाच्या वर खाताे, पण यामुळे आपली पचनयंत्रणा अस्ताव्यस्त हाेते. आतडी आजारी पडतात.
उपवास करण्याने पाेटाच्या आतील अवयव म्हणजे आतडी, यकृत, पित्ताशय यांना थाेडा आराम मिळताे.त्याचबराेबर त्याची कार्यकुशलता वाढते. साधकांच्या मते, उपवास करण्याने व्य्नतीमधील धैर्य, संयम, आत्मबल विकसित हाेते. आठवड्यातील एक दिवस घरातील सर्वांनी उपवास केला, तर आराेग्याबराेबरच अन्नाचीही बचत हाेईल.
लालबहादूर शास्त्रींनी या नियमाला आपलंस केलं हाेतं. महात्मा गांधींचाही उपवासाला पाठिंबा हाेता, ते माैन व्रतही ठेवत असत.आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद दाेन्हीने उपवासाला समर्थन दिले आहे.
या शास्त्रांनुसार, उपवास करण्याने राेगांचा समूळ नाश हाेताे. थाेडक्यात, उपवासाचेफायदे अनेक आहेत, म्हणून आपल्या जीवनात उपवासाला स्थान द्यायला हवे. तरीही मधुमेह, र्नतदाब आणि एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त व्य्नतींनी सावधगिरी बाळगायला हवी. गर्भवती महिला आणि छाेट्या मुलांनी उपवास करू नये.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम