अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- दूरसंचार क्षेत्रातील मोबाईल कंपन्यांना दिलासा देण्याच्या घोषणेनंतर आता केंद्र सरकारने ग्राहकांसाठीही अनेक सुविधा जाहीर केल्या आहेत.
दूरसंचार मंत्रालयाने नवीन मोबाईल सिम मिळवण्यासाठी आणि प्रीपेड ते पोस्टपेड आणि पोस्टपेड ते प्रीपेड मध्ये बदलण्याचे नियम बनवण्याचे आदेश जारी केले आहेत.

जे ग्राहक बाजारात जातात आणि मोबाईल सर्व्हिस कंपनीच्या दुकानातून किंवा शोरूममधून नवीन मोबाईल सिमकार्ड घेतात त्यांना मोठी सोय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता यासाठी कोणत्याही दस्तऐवजाची गरज भासणार नाही. सध्या, सिम मिळवण्यासाठी, आधार किंवा इतर कोणतेही दस्तऐवज अर्जासोबत सादर करावे लागतील.
तसेच नव्या आदेशानुसार, जर तुम्हाला घरी बसून नवीन मोबाईल सिम घ्यायचे असेल तर ते आता शक्य होईल. यासाठी तुम्हाला ज्या कंपनीचे सिम कार्ड घ्यायचे आहे त्या कंपनीच्या अॅप किंवा वेबसाइटवर फक्त अर्ज भरावा लागेल.
अर्ज भरताना, अर्जदाराला पर्यायी क्रमांक भरावा लागेल. ज्यावर ओटीपी पाठवून अर्जदाराची सत्यता तपासली जाऊ शकते. मोबाईल कंपनी अर्जदाराची सर्व माहिती फक्त DigiLocker किंवा आधार द्वारे मिळालेल्या माहितीवरून पडताळण्यास सक्षम असेल.
जर कंपनी आधार वरून माहिती घेत असेल तर अर्जदाराची संमती घेणे आवश्यक असेल. अर्जदाराला त्याच्या फॉर्मवर त्याचा फोटो अपलोड करावा लागेल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, एक निष्क्रिय सिम ग्राहकाला दिलेल्या पत्त्यावर पुरवला जाईल आणि काही प्रक्रिया आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतर सिम कार्ड सक्रिय केले जाऊ शकते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम