Laptop Tips and Tricks : तुमचाही लॅपटॉप सारखा हँग होतो? वापरा ‘ही’ ट्रिक, लगेच होईल सुपरफास्ट

Published on -

Laptop Tips and Tricks : सध्याच्या काळात स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉप हे महत्त्वाचे डिव्हाइस झाले आहे. परंतु, अनेकांचा लॅपटॉप आपोआपच हँग होतो त्याशिवाय त्यांना डेटाही सेव्ह करता येत नाही.

त्यामुळे ते लॅपटॉपला सतत रिस्टार्ट करतात. जर तुम्हालाही ही समस्या येत असेल तर काळजी करू नका. यासाठी काही ट्रिक्स वापरा, मिनिटातच तुमचा लॅपटॉप सुपरफास्ट होईल.

अनेकदा चालू लॅपटॉपचा वेग कमी होणं किंवा हँग होणे यांसारख्या समस्यांमुळे तुम्हीही हैराण असाल, तर त्यासाठी लॅपटॉपच्या काही टिप्स आणि ट्रिक्स जाणून घ्या.

कशाप्रकारची समस्या असते

  • लॅपटॉपचा वेग कमी होणं
  • लॅपटॉपची बॅटरी लवकर संपते
  • काम करत असताना हँग होण्याची समस्या
  • स्टोरेज लवकर भरणे

अशी घ्या काळजी

एकाच वेळी अनेक विंडोज उघडणे –

अनेकदा काही जणांकडून काम करताना एकाच वेळी अनेक विंडोज उघडल्या जातात. परंतु असे केल्याने तुमचा लॅपटॉप लवकर खराब होतो. त्यामुळे तुम्हीही अशी चूक करत असाल तर ही चूक टाळा.

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करा –

तुमच्या लॅपटॉपमध्ये अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर असणे खूप गरजेचे आहे. यामुळे केवळ लॅपटॉप सुरक्षित राहत नाही तर आपल्या गोपनीयतेची काळजी घेतली जाते.

रिसायकल बिन साफ करा –

लॅपटॉपमधील मेमरी पूर्ण झाल्यामुळे तो हळूहळू काम करतो. त्याशिवाय सतत हँग होतो. त्यामुळे अशावेळी लॅपटॉपमधून रिडंडंट डेटा हटवणे हा उपाय नाही. त्यासाठी वेळोवेळी रिसायकल बिन साफ ​​करणे गरजेची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News