Don 3 : बॉलिवूडसाठी (Bollywood) 2022 हे वर्ष कसोटीचे ठरले आहे. कारण या वर्षात आलेले बॉलिवूडचे सगळे सिनेमे फ्लॉप (Movie flop) झाले आहेत.
अगदी दिग्गज सुपरस्टार्सच्या (Bollywood Superstars) सिनेमांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले आहेत. हे पाहून बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान (Shah Rukh Khan ) याला सुद्धा धडकी भरली आहे.

शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी तीन चित्रपटांची घोषणा केली होती. पठाण (Pathan), जवान आणि डंकी हे त्यांचे तीनही चित्रपट सध्या चर्चेत आहेत. याशिवाय शाहरुख खानही नुकताच रॉकेट्री (Rocketry) या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसला होता.
आता त्याला लवकरच डॉन 3 मध्ये पाहण्याची इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने या चित्रपटासाठी नकार दिला आहे.
नुकताच हा चित्रपट शाहरुखला ऑफर करण्यात आला होता. चित्रपटाची स्क्रिप्ट फरहान अख्तरने (Farhan Akhtar) लिहिली आहे. पण आता शाहरुख त्या स्क्रिप्टवर समाधानी नसल्याचं ऐकायला मिळतंय. त्यामुळेच त्याने सध्या हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा शाहरुखला स्क्रिप्टबद्दल पूर्ण खात्री आहे, तेव्हा त्याला ही भूमिका पुन्हा करायला आवडेल. बॉक्स ऑफिसची परिस्थिती सध्या चांगली चालत नसल्यामुळे, कोणत्याही प्रोजेक्टवर साइन करण्यापूर्वी त्याला अनेक वेळा विचार करावासा वाटतो. सध्या फरहान पुन्हा डॉन 3 च्या स्क्रिप्टवर काम करत आहे.
डॉन 3 अद्याप प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे, त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत चाहत्यांना शाहरुख खान जवान आणि पठाणमध्ये पाहायला मिळणार आहे.
शाहरुखचा पठाण हा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपट आहे. यात त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणही दिसणार आहेत.