Fraud Alert : सध्याच्या काळात अनेकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक कामे चुटकीसरशी होत आहे. तसेच त्यामुळे सगळे जग मुठीत आले आहे. स्मार्टफोनचे खूप फायदे असले तरी त्याचे तोटेही आहेत. आता स्मार्टफोन म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची अॅप्स आलीच.
परांतु, याच अॅपमुळे तुमचे खाते एका मिनिटात रिकामे होऊ शकते. कारण अशी अनेक बनावट अॅप्स आहेत जी बँक खात्यातील पैसे गायब करत आहेत. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अशी अॅप्स असतील तर ती आताच डिलीट करा नाहीतर तुम्ही आर्थिक संकटात येऊ शकता.

अशी अॅप्स आहेत, इन्स्टॉल करू नका
अँटी व्हायरस अॅप
तुम्हाला असे अनेक अॅप्स सापडतील, जे तुमच्या मोबाईलला व्हायरसपासून वाचवण्याचा दावा करत असतात. परंतु तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारचे अँटी व्हायरस अॅप इन्स्टॉल करण्याची गरज नाही. जरी ते मोफत असले तरी असे अॅप लोकांचा डेटा चोरतात.
फ्लॅश लाइट अॅप
सध्या आजकाल मोबाईल फोन फ्लॅश लाइटसह येतात, ज्याचा वापर तुम्ही अंधारात टॉर्च म्हणूनही करू शकता. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या अॅपमध्ये वेगवेगळे फीचर्स असल्याने अनेकजण ते इन्स्टॉलही करतात. परंतु तुम्ही असे कधीच करू नका. कारण असे अॅप तुमची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती चोरू शकतात.
कीबोर्ड अॅप
तुमच्या स्मार्टफोनवर वेगळे कीबोर्ड अॅप कधीही इन्स्टॉल करू नका. जर तुम्ही असे केले तर हे बनावट अॅप टायपिंगच्या वेळी तुमचे पासवर्ड चोरतात आणि तुमची आयुष्यभराची कमाई डोळ्याच्या झटक्यात चोरू शकतात.
क्लीन अॅप
मोबाईलमधील जंक फाईल्स काढून त्या स्वच्छ करण्यासाठी अनेकजण स्वतंत्र क्लीनिंग अॅप इन्स्टॉल करत असतात. परंतु हे बनावट अॅप तुमच्याकडून अनेक परवानग्या मागून तुमची सर्व माहिती चोरतात. त्यामुळे असे अॅप वापरू नका.