राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या असतील असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यावर राज ठाकरेंनी सरकारचे अभिनंदन करत आता कच खाऊ नका, या निर्णयाची नीट अंमलबजावणी करावी असे आव्हान केले आहे.
मराठीत पाट्या असाव्यात यावर खरे आंदोलन महाराष्ट्र सैनिकांनी 2008 आणि 2009 साली आंदोलन केले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचे आहे.
ठाकरे म्हणाले, अनेकांनी केसेस अंगावर घेतल्या आहेत. तसेच काहींनी शिक्षा देखील भोगल्या आहेत. त्यामुळे यावर कोणीही श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, असे पत्रकाद्वारे म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे. हा निर्णय घेताना सरकारने आणखी एक भानगड करून ठेवली आहे. मात्र, मराठी सोबत इतर भाषांना परवानगी देण्यात आली आहे. मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे?
दरम्यान, महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.