ATM Tips : एटीएम कार्ड आल्यापासून अनेकजण बँकेच्या लांब रांगेत उभे राहून पैसे काढण्याचे टाळतात. आर्थिक व्यवहार करत असताना एटीएम कार्ड असेल तर तुमची कामेही लवकर होतात.
परंतु, सध्या फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्याशिवाय एटीएम वापरत असताना आपल्याकडून अशा काही चुका होतात त्यामुळे तुमचे पैसे एटीएम मशीनमध्ये अडकतात.
काही एटीएम मशिनमधून पैसे काढण्याच्या वेगळ्या पद्धती असतात. काही मशिनमध्ये पिन क्रमांक अगोदर टाकावा लागतो, तर काहींमध्ये तो नंतर द्यावा लागतो. त्याशिवाय, काही एटीएम मशिनमध्ये कार्ड अगोदर काढावे लागते, तर काहींमध्ये नंतर
अशी होते चूक
जेव्हा तुम्ही पैसे काढण्यासाठी जाता तेव्हा त्या मशीनची यंत्रणा काय आहे हे अगोदर तुम्हाला पाहावे लागेल. अनेक मशिनमध्ये तुम्ही कार्ड टाकता,त्यानंतर पिन नंबर टाकता मग पैसे येण्याची वाट पाहता. परंतु अनेक मशीन्स तुम्हाला अगोदर तुमचे डेबिट कार्ड काढायला सांगतात.
जेव्हा मशीन पैसे मोजायला सुरुवात करते तेव्हा डेबिट कार्डच्या ठिकाणी एक लाईट लागते. त्यानंतर तुम्हाला कार्ड काढण्यास सांगते. परंतु, एखाद्या व्यक्तीने अगोदर कार्ड काढले नसेल तर तुमचे पैसे मशीनमध्ये अडकू शकतात . त्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज मिळतो.
जर तुमच्यासोबतही असे झाले तर काळजी करू नका. थोडा वेळ थांबा आणि काही मिनिटांत पैसे तुमच्या बँक खात्यात परत येतील. जर असे झाले नाही तर तुमच्या बँकेला कळवा. त्याचबरोबर पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्या.