Maruti Suzuki : अशी संधी गमावू नका! वॅगनआर, स्विफ्ट, डिझायरसह मारुतीच्या ‘या’ कार्सवर मिळत आहे सर्वात मोठी सूट

Ahmednagarlive24 office
Published:

Maruti Suzuki : जर तुम्ही नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता खूप स्वस्तात तुमच्या स्वप्नातली कार विकत घेऊ शकता. या महिन्यात दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या अनेक कार्सवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देत आहे.

तुम्ही आता वॅगनआर, स्विफ्ट, डिझायरसह मारुतीच्या अनेक कार्सवर सवलत मिळवू शकता. हे लक्षात ठेवा की अशी ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार घेणार असाल तर अशी संधी चुकवू नका. या कार कोणत्या आहेत पहा यादी.

मिळत आहे अल्टो सूट

मारुती सुझुकीच्या Alto K10 कंपनीकडून 30,000 रुपयांची ग्राहक ऑफर आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच यावर एकूण 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच या कारवर 49,000 रुपयांची सूट मिळत आहे.

तर दुसरीकडे, मारुती सुझुकी अल्टो 800 ला 20,000 रुपयांची ग्राहक ऑफर, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,100 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. या कारच्या खरेदीवर 38,100 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

जाणून घ्या मारुती सुझुकी सेलेरियो ऑफर

नवीन मारुती सुझुकी सेलेरियो 2023 च्या उत्तरार्धात बाजारात पदार्पण करणार आहे. आता कंपनीच्या या कारवर एकूण 44,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. यात 25,000 रुपयांची रोख सवलत,15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि रु. 4,000 कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.

स्वस्तात मिळत आहे वॅगनआर

देशातील सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या कारपैकी एक मारुती सुझुकी वॅगनआर आहे, आता या कारवर एकूण 59,000 रुपयांची सूट मिळत आहे. यात 40,000 रुपये रोख सूट, 15,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपये कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

मारुती स्विफ्ट

कंपनीच्या कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार स्विफ्टबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी या कारवर एकूण ₹ 49,000 ची सवलत देत आहे. यामध्ये ₹30,000 ची रोख सवलत, ₹15,000 चा एक्सचेंज बोनस आणि ₹4,100 ची कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.

मारुती सुझुकी डिझायर

मारुती सुझुकी त्यांच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या डिझायर कारवर ₹10000 चा एक्स्चेंज बोनस मोफत देत आहे. हे लक्षात घ्या की कंपनीने या कारवर कोणत्याही प्रकारची कॅश आणि कॉर्पोरेट सूट दिली नाही.

जाणून घ्या मारुती इको डिस्काउंट ऑफर

कंपनीकडून Eeco कार्गोवर ₹15,000 ची रोख सवलत आणि ₹4,000 च्या कॉर्पोरेट सूटसह ₹10,000 चा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे.

हे लक्षात ठेवा की ही सूट ऑफर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळी असू शकते. याशिवाय, ते कार आणि डीलर्सच्या उपलब्धतेवर देखील अवलंबून असते. इतकेच नाही तर तुमच्या शहरात ही सूट ऑफरची रक्कम वेगळी असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe