Amazon Offers : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी Amazon Prime Phones Party Sale मध्ये एक सुवर्णसंधी आहे. या सेलमधून तुम्ही खूप स्वस्तात 5G स्मार्टफोन विकत घेऊ शकता. Oppo F21s Pro 5G वर मोठी सवलत मिळत आहे.
त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. तसेच हे लक्षात घ्या की ही सेल फक्त 8 फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे लवकरात लवकर कमी किमतीत जास्त फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन विकत घ्या. अशी ऑफर सारखी उपलब्ध होत नाही.
जर या फोनच्या स्टोरेजचा विचार केला तर यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनची किंमत 31,999 रुपये इतकी आहे. परंतु, तुम्ही या सेलमध्ये, 25,999 रुपयांमध्ये 19% डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता.
तसेच जर तुम्ही ICICI किंवा HDFC बँक कार्डने पैसे भरले तर तुम्हाला 2500 रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल. या दोन्ही ऑफरसह, फोनवर एकूण 8,500 रुपयांची सूट उपलब्ध होईल. यावर एक्सचेंज ऑफर उपलब्ध असुन तुम्हाला आणखी फायदा मिळेल.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी या 5G फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंच फुल एचडी+ डिस्प्ले देत असून जो 60Hz च्या रिफ्रेश दर आणि 180Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला समर्थन देतो. हा फोन 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजने सुसज्ज असणार आहे. प्रोसेसर म्हणून यात Adreno 619 GPU सह Snapdragon 695 चिपसेट दिला जात आहे.
तसेच फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे असून यात 64-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरचा समावेश असणार आहे. तर सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Oppo चा हा 5G फोन 4500mAh बॅटरीने सुसज्ज असून जो 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. जर याच्या OS बद्दल बोलायचे झाले तर फोन ColorOS 12.1 वर काम करतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi 5, Bluetooth 5.1, GPS आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय दिले आहेत.