LIC : निवृत्तीनंतर पैशाची काळजी करू नका ! LIC ने आणली भन्नाट योजना, मिळणार दरमहा ‘इतकी’ पेन्शन

LIC : म्हातारपण सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकजण गुंतवणूक करतात. जर तुम्हालाही तुमचे म्हातारपण सुरक्षित ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण जर तुम्ही एलआईसीच्या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याला चांगले पैसे मिळतील.

एलआईसीच्या या योजनेचे नाव जीवन शांती योजना आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात गुंतवणूकदाराला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही तसेच यात परतावाही जबरदस्त मिळतो. त्यामुळे अनेकजण एलआईसीच्या या योजनेत गुंतवणूक करतात.

जर तुम्ही LIC च्या या योजनेत गुंतवणूक केली तर तुमचे निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहते. ही वार्षिकी योजना असून त्यात गुंतवणूक केली तर तुमच्या पेन्शनची रक्कम निश्चित होते.

या योजनेची किमान गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख रुपये निश्चित केली आहे. जर आपण कमाल गुंतवणुकीच्या मर्यादेबद्दल बोललो, तर त्यावर अद्याप निर्णय झालेला नसून तुम्हाला वर्षाला किमान 12,000 रुपये परतावा दिला जातो.

समजा जर तुम्ही या योजनेत 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतील. म्हणजेच याचा असा अर्थ की तुम्ही महिन्याला 1,000 रुपये पेन्शन घेता येईल. तुम्हाला या योजनेअंतर्गत मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन घेता येते.

विशेष म्हणजे जर तुम्ही एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते. गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला लगेच किंवा 1 ते 20 वर्षांच्या दरम्यान पेन्शनचा लाभ मिळू शकतो. ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe