Indian Railways : ट्रेनला उशीर झाला तर काळजी करू नका, 20 रुपयात मिळेल हॉटेलसारखी सुविधा

Ahmednagarlive24 office
Published:

Indian Railways : रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. असंख्य लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. मुंबईसारख्या ठिकाणी प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वेने काही नियमात बदल केला आहे. तर रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते.

यातील काहीजणांना रेल्वेच्या सुविधेबद्दल माहिती असते. तर काहीजणांना याबद्दल माहिती नसते. अनेकदा रेल्वे काही कारणामुळे उशिरा येते. अशावेळी प्रवाशांना काय करायचे असा प्रश्न पडतो.तुमच्याबाबतही असे झाले असेल तर काळजी करू नका, तुम्हाला फक्त 20 रुपयात हॉटेलसारखी सुविधा मिळेल कसे ते पहा.

आता प्रवाशांना फारसा पैसा खर्च करण्याचीही जास्त गरज नाही. कारण तुम्ही आता 20 ते 50 रुपये खर्चून या अप्रतिम सुविधेचा लाभ घेऊ शकता. माहितीच्या कमतरतेमुळे काहीजणांना रेल्वेने दिलेल्या या सुविधेचा लाभ घेता येत नाही.

आता रेल्वेच्या या सुविधेअंतर्गत तुम्ही ट्रेनला उशीर झाला तर तुम्ही 20 ते 50 रुपये खर्च करून रिटायरिंग रूम सहज खरेदी करू शकता. तुम्ही रिटायरिंग रूममध्ये राहिला तर तुम्हाला तेथे अनेक उत्तम सुविधा मिळतात.

हे लक्षात ठेवा की रिटायरिंग रूमची सुविधा फक्त कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. प्रवासी 24 किंवा 48 तास रिटायरिंग रूममध्ये राहू शकतात.

जर तुम्हालाही या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता फक्त 20 ते 40 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच तुम्हाला वसतिगृहासाठी 10 रुपये वेगळे द्यावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe