डॉ.विखे पाटील आयटीआय मध्ये प्रशिक्षण सुरु कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट ट्रेडला भविष्य

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- कॉम्प्युटर हा आजच्या युगाचा अविभाज्य भाग झालेला आहे. कोणतेही काम हे त्या शिवाय होऊच शकत नाही. ज्याला कॉम्प्युटरची माहिती नाही तो आज निरक्षर ठरत आहे.

आयटीआय मध्ये शिकवला जाणार कॉम्प्युटर ऑपेरटर अ‍ॅण्उ प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेडला भविष्य उज्वल आहे, असे प्रतिपादन निदेशक शोभा नलगे-ढाकणे यांनी केले.

एमआयडीसी येथील डॉ.विखे पाटील आयटीआय मध्ये या कोर्सेला सुरु करण्यात आली असून, त्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. याप्रसंगी प्राचार्य राम क्षीरसागर, गटनिदेशक संदिप भुसे उपस्थित होते.

यावेळी सौ.नलगे यांनी या कोर्स विषयी माहिती देतांना सांगितले की, आयटीआय मध्ये शिकवला जाणारा ट्रेड असून, शैक्षणिक पात्रता 10 वी पास अशी आहे.

प्रशिक्षण कालावधी 1 वर्षांचा असून तो उत्तीर्ण झाल्यावर एका वर्षातच तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता. आज सर्व महत्वाच्या फर्मस्, दुकाने, कंपनी, कॉल सेंटर, कॉम्प्युटर इन्स्टिट्युट,

सरकारी क्षेत्रातील डीआरडीओ, व्हीआरडीई, रेल्वे यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच स्वयंरोजगर देखील तुम्ही सुरु करु शकता, असे त्या म्हणाल्या.

या ट्रेडमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कन्सेप्टस, इंटरनेट नेटवर्किंग, वेब डिझायनिंग, एमएस ऑफीस, जावा, स्क्रिप्ट, व्हिज्युअल बेसिक, टॅली, ई-कॉमर्स,

सायबर सिक्युरिटी इत्यादी सखोलज्ञान भरपुर प्रात्यक्षिकांसह दिले जात आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य राम क्षीरसागर (मो.8554990220) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गटनिदेशक संदिप भुसे यांनी केले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe