अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ डॉक्टरचा जामीन फेटाळला.! कोणत्याही क्षणी अटक होणार…

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. योगेश निघुते यांची पत्नी डॉ. पुनम यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्पुरता जामीन मिळालेल्या डॉ. योगेश यांना न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे.

आज सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, आता पोलिसांनी ठरविले तर डॉ. योगेश निघुते यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

त्यांना शोधण्यात अपयश आले तर, डॉ. निघुते यांना उच्च न्यायालय औरंगाबाद येथे पुन्हा जामीन टाकण्यात वेळ मिळणार आहे. त्यामुळे, आता पोलीस त्यांचा शोध घेतात की,

आता हायकोर्ट त्यांना दिलासा देते याकडे संपुर्ण तालुक्याच लक्ष लागले आहे. संगमनेर शहरातील बालरोग तज्ञ योगेश यशवंत निघुते (रा. चिरायु हॉस्पिटल ताजणे मळा, संगमनेर)

यांच्या सौभाग्यवती डॉ. पुनम निघुते यांनी रविवार दि. 29 आँगस्ट 2021 रोजी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

त्यानंतर डॉ. योगेश निघुते यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. लग्नानंतर पाच ते सहा महिन्यापासून ते 29 आँगस्ट 2019 पर्यंत पुनम यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते.

तर, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करीत होते. त्यामुळे त्यांनी पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर, पुनम यांचे बंधू शरद कमलाकर कोलते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. योगेश निघुते यांच्यावर कलम 306, 304 (ब), 498 व 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!