Dream 11 ने ‘त्या’ला केले मालामाल अवघ्या पन्नास रुपयांत जिंकला एक कोटींचं बक्षीस !

Published on -

IPL2021 चे उर्वरीत सामने आबु-धाबी येथे खेळवण्यात येत आहेत. क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या या लीगच्या कालावधीत खेळण्यात येणाऱ्या ड्रीम टीम स्पर्धेमध्ये एका नाभिकाला लखपती बनवले आहे.

काय आहे Dream 11
ड्रीम ११ ही एक ऑनलाइन स्पर्धा आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकाला सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघांमधील २२ खेळाडूंपैकी ११ खेळाडूंची निवड करुन आपला संघ बनावयचा असतो.

एखाद्या स्पर्धकाने निवडलेल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर त्यांना चांगले गुण मिळतात, याच गुणांच्या आधारे सामना संपल्यानंतर विजेता घोषित केला जातो.

एक कोटींचं बक्षीस मिळालं
“सामना संपल्यानंतर मी पहिल्या स्थानावर होतो आणि मला एक कोटींचं बक्षीस मिळालं. त्यानंतर मला ड्रीम ११ कडून फोन आला.

त्यांमी मला पुढील दोन तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर कर वजा करुन ७० लाख रुपये जमा केले जातील असं सांगितलं.

अशोक फार पूर्वीपासूनच मोबाईलवरुन या ड्रीम टीमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असल्याचं सांगतो. या पैशांमधून आपल्या कुटुंबावर असणारं कर्जाचं ओझं उतरवण्याबरोबर नवीन घर बांधण्याचा अशोकचा विचार आहे.

नशीबवान ठरेल असं मला वाटलं नाही
“मी ५० रुपये प्रवेश शुल्क भरुन चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समधून माझा संघ निवडला होता. मी एवढा नशीबवान ठरेल असं मला वाटलं नव्हतो.

खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने …
सामना संपला तेव्हा मी निवडलेल्या संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने माझा थेट पहिला क्रमांक आला. खरं तर या खेळाडूंमुळेच मला एक कोटी रुपयांचं बक्षिस मिळालंय,” असं अशोक सांगतो.

कर्ज फेडून नवीन घर बांधण्याला प्राधान्य
मी आता जे काम करतोय ते मला फार आवडतं. मी भविष्यातही हेच काम करत राहणार आहे. सध्या कर्ज फेडून नवीन घर बांधण्याला माझं प्राधान्य आहे,” असं अशोक म्हणाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News