Skin Care Tips : अनेकांना हर्बल टी आवडत नसला तरी तो खूप फायदेशीर आहे. कारण हर्बल टी तुमच्या यादीतून काढून टाकण्यापूर्वी त्याचे फायदे जाणून घ्या. याचा खूप मोठा फायदा म्हणजे यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
अनेकजण ग्लोसाठी वेगवेगळी औषधे घेतात तरीही त्यांना काही फरक पडत नाही. परंतु, तुम्ही रोज सकाळी हर्बल टी घेतला तर तुमच्याही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.
1. ग्रीन टी
ग्रीन टी हा एक शक्तिशाली आरोग्यदायी असण्यासोबतच हा ब्युटी टी म्हणून खूप फायदेशीर आहे. जो केस आणि त्वचेसाठी खूप चांगले आहे. तसेच अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, ग्रीन टी तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनवते आणि वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढण्यास तो मदत करतो.
2. गुलाब चहा
हर्बल गुलाब चहा तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे. हा देखील अँटिऑक्सिडंटने समृद्ध आहे. याला नैसर्गिक रेटिनॉल म्हणतात. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेजपणा यासारख्या अकाली वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढतो. याव्यतिरिक्त, जीवनसत्त्वे A, B3, C आणि E, गुलाब चहा केसांच्या वाढीसाठी उत्तम आहे.
3. लॅव्हेंडर टी
लॅव्हेंडर टी केसांतील कोंड्याशी लढण्यास, आपल्या टाळूला शांत करण्यासाठी तसेच केस गळती कमी करण्यासाठी केस धुण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्वचेच्या संसर्गाची शक्यता कमी करतो. त्वचेला आतून निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी डिटॉक्सिफाय करतो.