औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करोनावरील औषधे देऊ नये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात करोना सदृश लक्षणे असणारे रुग्ण खासगी रुग्णालयात, एक्स रे काढण्यासाठी, सीटी स्कॅनसाठी परस्पर आल्यास त्यांच्या नोंदी ठेवून प्रशासनाला कळविण्याचे बंधन खासगी डॉक्टरांना घालून देण्यात आले आहे.

तर औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करोनावरील औषधे देऊ नयेत व रुग्णांच्या नोंदी ठेवाव्यात, असा आदेशही देण्यात आला आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यंत्रणा आणखी गतिमान केली आहे. जिल्ह्यासाठी आणखी ५० हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट कीट्स प्राप्त झाले असून चाचण्यांची गती आता वाढविण्यात येणार आहे.

सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. तरीही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता तालुकानिहाय दौरे आणि बैठका सुरू केल्या आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रावर दररोज किमान ५० आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये किमान १५० आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाव्यात. लसीकरण मोहिमेवेळी गर्दी होणार नाही यासाठी लसीकरण केंद्रावर पुरेसे नियोजन करावे,

अशा सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या आहेत. दरम्यान रुग्णांच्या शोध मोहिमेत खासगी डॉक्टर आणि औषध दुकानदारांचीही मदत घेण्यात येणार असून त्यांना नोंदी ठेवण्याचे बंधन घालून देण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe