अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- नववर्ष स्वागत, नाताळच्या पार्श्वभूमीवर मद्यपी चालकांवर अंकुश राहावा यासाठी वाहतूक पोलिसांकडून आठवडाभरात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.(Drunk driving)
मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम थेट १० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला तसेच नाताळच्या सणानिमित्ताने पब, हॉटेल, ढाब्यांमध्ये जंगी मद्य पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अपघात टाळण्यासाठी मद्यपीने वाहन चालवू नये असा नियम आहे.
या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असते. त्यांच्यावर दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते. दंडाची रक्कम कमी असल्याने काही वाहनचालकांकडून पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन होत असते.
म्हणून मद्यसेवन करून वाहन चालवल्याबद्दल सध्या असलेला दोन हजार रुपयांचा दंड येत्या पाच दिवसांत १० हजार रुपये केला जाणार आहे. राज्य सरकारने १ डिसेंबरपासून सुधारित मोटार वाहन कायदा लागू केला आहे.
भरधाव वेगात वाहन चालवणे, विनासीटबेल्ट, विनाहेल्मेट, वाहतूक नियमांची पायमल्ली, दुचाकीवरून अतिरिक्त प्रवासी वाहतुकीसह अनेक वाहतूक नियमांत सुधारणा करून त्यात दंड वाढवण्यात आला. त्यात पाच ते दहापट रकमेची वाढ केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये परवाना रद्द करण्याची येणार असल्याची तरतूद केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम