Rajyog and Yog On Dussehra 2023 : यावेळचा दसरा खूप खास असणार आहे, कारण या वर्षी एकीकडे दसरा पंचकमध्ये येत आहे, तर दुसरीकडे या दिवशी अनेक दुर्मिळ योग देखील तयार होत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमीला रवि योग आणि वृद्धी योगाचा योग आहे. या दोन योगांचा शुभ संयोग विशेष फल देणारा सिद्ध होईल. दसर्याच्या एकाच दिवशी तूळ राशीत मंगळ, सूर्य आणि बुध उपस्थित राहतील, या तीन ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होईल.
ज्योतिष शास्त्रानुसार सध्या शनि कुंभ राशीत स्थित आहे, जिथे शशा राजयोग निर्माण करत आहे. 30 वर्षांनंतर असे घडेल की दसऱ्याच्या शुभ संयोगात शनि आपल्या मूलत्रिकोण राशीत कुंभ राशीत बसून शश नावाचा राजयोग तयार करेल. बृहस्पति आणि शुक्र सुद्धा समोरासमोर बसले आहेत, त्यामुळे समसप्तक योग आणि धन योग तयार होत आहे. यासोबतच तूळ राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार झाला आहे. असे अनेक शुभ योग एकत्र तयार झाल्यामुळे काही राशींना याचा फायदा होणार आहे.

‘या’ राशींना होईल फायदा !
कर्क
दसऱ्याच्या दिवशी एकत्र अनेक राजयोग घडणे कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या शुभ योगांमुळे विशेष लाभ मिळू शकतो. तसेच मोठा नफा देखील होऊ शकतो, या काळात व्यवसायात गुंतवणूक करणे देखील फायदेशीर ठरू शकते. लांबलेली किंवा रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांसाठी काळ अतिशय शुभ राहील. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल आणि कुटुंबात आनंद मिळेल. आर्थिक स्थिती देखील सुधारेल.
वृषभ
योग राजयोग आणि दसरा सण या वर्षी लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होईल. या काळात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला अचानक मिळू शकतात. करिअरमध्ये फायदा होऊ शकतो. तुम्हाला अपेक्षित संधी मिळू शकतात. शुभ संयोगाच्या प्रभावामुळे तुम्हाला अचानक अडकलेला पैसा मिळू शकतो आणि राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या संपत्तीत वाढ देखील होऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. करिअरशी संबंधित नवीन संधी देखील उपलब्ध होऊ शकतात.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी दसरा खूप खास असेल, कारण तूळ राशीतच त्रिग्रही आणि बुधादित्य योग तयार होत आहेत. षष्ठ आणि धन योगाचा लाभही तुम्हाला मिळेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी काळ चांगला राहील, पदोन्नती आणि वेतनवाढीची देखील शक्यता आहे. या काळात आरोग्य चांगले राहील, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. तुम्हाला सोने खरेदीची संधी मिळेल आणि तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे.
कुंभ
दसऱ्याच्या दिवशी राजयोग तयार होणे या राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी असेल, कुंभ राशीतच शनि स्थित असल्यामुळे शश राजयोग तयार झाला आहे, जो या राशीच्या लोकांना विशेष लाभ देऊ शकतो. या काळात नशीब पूर्ण साथ देईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. कर्जापासून मुक्ती आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याची जोरदार चिन्हे आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक जीवनात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.