अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथील ५ अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाने छापा टाकून २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आज दि. २१ सप्टेंबर रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत सोनगाव सात्रळ येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सोनगाव सात्रळ येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन,
तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला. यावेळी दिलीप वामन पवार (वय 45 रा. सोनगाव सात्रळ), सुभाष वामन पवार, मुन्ना लक्ष्मण पवार, वसंत भिवसेन पवार व सविता एकनाथ बर्डे यांच्याकडून एकूण 2,11,500 रुपये किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपीकडून ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे,
मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे सोनगाव सात्रळ परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे सोनगाव सात्रळ येथील महिलांनी डीवायएसपी संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहे.
सदरची कारवाई श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,
सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, हेडकोन्स्टेबल सुरेश औटी, संजय राठोड, पोलीस नाईक देविदास कोकाटे व आरसीपी पथक आदींनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम