Edible Oil : खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे (edible oil) सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात (festive season) केंद्र सरकार (central government) तेलासह इतर वस्तूंच्या किमती कमी करणार आहे.
अनेक महिन्यांपासून तेलाचे भाव चढेच असल्याने याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. भारताने क्रूड आणि रिफाइंड पाम तेल (crude and refined palm oil) , कच्चे सोया तेल (crude soya oil) आणि सोन्याच्या (gold) मूळ आयात किंमती कमी केल्या आहेत.
येत्या काही दिवसांत खाद्यतेल आणि सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारने (Modi government) या पंधरवड्यात खाद्यतेलाच्या किमती, सोने-चांदीच्या आधारभूत आयातीच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कच्च्या पाम तेलाच्या आधारभूत किमतीत कपात
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. अहवालानुसार, सरकारने कच्च्या पाम तेलाची आधारभूत किंमत $996 प्रति टन वरून $937 केली आहे. आता पामतेलाच्या आधारभूत किमतीत कपात केल्याने खाद्यतेलाच्या किमती खाली येतील अशी अपेक्षा आहे.
मूळ आयात किमतीत किती कपात झाली ते जाणून घ्या
अहवालानुसार, RBD पाम तेलाची आधारभूत किंमत $ 1,019 वरून $ 982 प्रति टन आणि RBD पामोलिनची $ 1,035 वरून $ 998 प्रति टन झाली आहे. याशिवाय जर आपण कच्च्या सोयाबीन तेलाबद्दल बोललो तर त्याची आधारभूत किंमत $1,362 वरून $1,257 प्रति टन पर्यंत कमी झाली.
मौल्यवान धातूबद्दल बोलायचे झाले तर सोन्याची मूळ किंमत प्रति 10 ग्रॅम $ 549 वरून 553 प्रति 10 ग्रॅम करण्यात आली आहे. त्याचबरोबर चांदीची आधारभूत किंमतही खाली आली आहे. पांढऱ्या धातूची आधारभूत किंमत प्रति किलो $635 वरून $608 प्रति किलो केली आहे.
किंमती आधीच खाली आल्या आहेत
केंद्र सरकारने आधीच कंपन्यांना किंमत कमी करण्यास सांगितले आहे. यानंतर 200 रुपये प्रतिलिटरने विकले जाणारे मोहरीचे तेल 150-160 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या महिन्यात कंपन्यांनी किमतीत 30-40 रुपयांनी कपात केली आहे. येत्या काही दिवसांत तेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता आहे.