Money News:खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) बदल करण्याच्या सूचना खाद्यतेल कंपन्यांना दिले असून त्यामुळे आगामी काळात खाद्य तेलाचे दर प्रति लिटर किमान २० रुपये घटण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने बुधवारी देशभरातील खाद्यतेलाच्या व्यापाराशी संबंधित आगाऊ भागधारकांची बैठक घेतली. या बैठकीत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली घसरण लक्षात घेऊन कंपन्यांना किमतीत कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे, इंडोनेशियाने पाम तेलावरील निर्यात बंदी उठवल्यानंतर आणि देशात मान्सूनचे आगमन वेळेत झाल्याने यावर्षी तेलबियांचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. यातून खाद्य तेलाचे दर १५ दिवसांपूर्वी स्वस्त झाले हाेते. त्यात आणखी दर कमी हाेऊन नवा दिलासा सामान्यांना मिळू शकणार आहे.
कंपन्यांनी दर कमी करण्याचे केले मान्य : ठक्कर
या बैठकीत काही कंपन्यांनी दर आणखी कमी करण्याचे मान्य केले. या कपातीचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल,अशी आशा अ. भा. खाद्यतेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी व्यक्त केली.