आयशर ट्रक पलटी , ट्रक आणि ट्रकमधील मालाचे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात बुधवारी (दि.१) पहाटे तीन वाजण्याच्या टायर फुटल्यामुळे मल्चिंग पेपर घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी झाला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

अपघातात ट्रक आणि ट्रकमधील मालाचे नुकसान झाले. नाशिक येथून साताऱ्याला मल्चिंग पेपर घेवून जात असलेला आयशर ट्रक (एम.एच. ४३ यु.८१५९) संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात पहाटे तीन वाजलेच्या सुमारास आला असता ट्रकचा पुढील टायर फुटला.

त्यामुळे सातारा येथील चालक सुनील शिंदे यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक उपरस्त्यावर पलटी झाला. या भागात नेहमी वर्दळ असते.

पहाटे अपघात झाल्याने मोठी जीवितहानी टळली. वाहतूक विस्कळीत झाली असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe