अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- ईद-ए-मिलाद मंगळवारी (१९ ऑक्टोबर) साजरी करण्यात येणार आहे. अटी व शर्तींचे पालन करून यादिवशी मिरवणूक काढण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
यासंबंधीचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला आहे. संबंधितांना स्थानिक पातळीवरून यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर नवरात्र आणि दसऱ्याचा सण झाला. आता ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती असल्याने या ईदच्या दिवशी मिरवणुका आणि धार्मिक प्रवचानांचे आयोजन केले जाते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मिरवणुकीला आणि मोठ्या उपक्रमांना परवानगी दिलेली नव्हती.
यावर्षी मात्र बरेच निर्बंध शिथील केलेले आहेत. ईदसाठीही मागर्दशक सूचना जारी करून काही सवलती दिल्या आहेत. तर काही निर्बंधही घालून दिलेले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करावे, ईद-ए-मिलाद शक्यतो घरात राहूनच साजरी करावी.
पोलिस प्रशासनाच्या पूर्व परवानगीने एका मिरवणुकीत जास्तीत जास्त ५ ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त ५ व्यक्तींना परवानगी देता येऊ शकेल. मिरवणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था करावी.
पमिरवणुकीच्या स्वागतासाठी महापालिका, पोलिस व स्थानिक प्रशासन यांच्या नियमांचे पालन बंधनकारक आहे.मिरवणूक आणि कार्यक्रमांत नियमांचे पालन करून मास्क,
सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन देण्यास परवानगी मिळेल. रस्त्यावर पाणपोई उभारण्यास परवानगी घ्यावी लागेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम