आठ वर्षांच्या ‘अहिल्या’चे अनोखे दान..!

Maharashtra News:भारतीय संस्कृतीमध्ये दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. विविध प्रकारचे दान करावे. हे आपली संस्कृती शिकवीते. त्यामुळे आज समाजातील अनेकजण विविध प्रकारचे दान करतात.

मात्र यात अहिल्या या चिमुकलीने केलेले दान विशेष कौतुकास्पद ठरत आहे.कॅन्सरचे उपचार घेत असलेल्या व्यक्तींमध्ये केमोथेरपी घेतल्याने त्यांचे केस गळणे आदी प्रकार होतात.त्यामुळे समाजात वावरताना अपमानास्पद वाटते.

या रुग्णाच्या जीवनात आनंदाचा क्षण आणता यावेत असा विचार, करून आठ वर्षांची चिमुकली अहिल्या तांबे हिने आपले केस कॅन्सरचे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी दान केले आहेत. अहिल्या ही सत्यजित तांबे यांची कन्या आहे.

आपल्या जीवनात दान ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. प्रत्येक व्यक्तीने काहीना काही दान करावे. असे आपले शास्त्र सांगते. दान व्यक्तीस मोह, माया, मत्सर यांसारख्या प्रवृत्तीपासून दूर कसे रहावे. हे शिकवीते असे म्हणतात. अहिल्याने हे दान करून भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe