Maharashtra news : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाकडून अद्याप फारसे काही मिळाले नाही.
त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठी राज्यपाल नियुक्त यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, राज्यपालांनी ही बारा जणांची नियुक्ती प्रलंबित ठेवली आहे.आता पुन्हा विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे.

त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीत खडसे यांचे नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी कडून विधान परिषदेसाठी रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कारण निंबाळकर विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांना पुन्हा निवडून आणणे आवश्यक आहे. तर राज्यपालांनी मंजूरी न दिल्याने खडसे यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आता यावेळी त्यांना संधी क्रमप्राप्त आहे, असे मानले जात आहे. असे असले तरी या जागांसाठी पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे.













