Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सुरवातीला शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी मागणी केल्याचे पुढे आले होते. मात्र, यावर आता शिंदे यांनी स्पष्ट भाष्य केले आहे.
एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार, लोकहिताचं सरकार ही भूमिका असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे म्हणाले, आम्ही शिवसेनेचे ४६ आमदार एकत्र आहोत. शिवसेनेची विचारधारा हिंदुत्वाची आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. आम्ही आनंद दिघे यांच्या सानिध्यात काम करणारे कार्यकर्ते आहोत.
त्यामुळे जो लोकांच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामधला हिंदुत्वाचा विचार आहे, तो आम्ही पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार, लोकहिताचं सरकार ही भूमिका आमदारांनी घेतली आहे.
आमदारांच्या समस्या आणि अडचणीबाबत वेळोवळी मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. निर्णय घेऊ. विचार करु, असे ते म्हणाले होते. पक्ष ताब्यात घेण्याची आमची कोणतीही मानसिकता नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. बैठकीनंतर पुढची रणनीती ठरेल. कोणासोबत ही संपर्क केला नाही.’ असेही शिंदे यांनी सांगितले आहे.