Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा पक्षाच्या आमदारांना व्हीप बजावण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे.
पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी शिवसेनेचे डावपेच सुरू झाल्याचे यावरून दिसून येते. यापूर्वी असे प्रकार झालेले आहेत. शिंदे प्रतोदपदावर असते तर इतर पक्षांना पाठिंबा देणे, अविश्वास ठराव अगर अन्य विषयांवर मतदानाची वेळ आल्यास कोणाला मत द्यायचे,
त्याचा आदेश आमदारांना देणे हे अधिकार शिंदे यांच्याकडे राहिले असते. त्यातून होणारा संभाव्य धोका ओळखून एकीकडे त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवत दुसरीकडे शिवसेनेने त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.