Electric Bike : वाढत्या महागाईत तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक बाइक खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला टॉप 5 इलेक्ट्रिक बाइक्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही खरेदी करू शकतात. याची रेंज देखील उत्तम आहे आणि लूक देखील जबरदस्त आहे. चला तर जाणून घेऊया या पाच दमदार इलेक्ट्रिक बाइक्सबद्दल संपूर्ण माहिती.
Ultraviolette F77 Electric Bike
अल्ट्राव्हायोलेट F77 इलेक्ट्रिक बाईक या बाईकचे दोन व्हेरियंट, ओरिजिनल आणि रेकॉन एकत्र बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनी या दोन्ही व्हेरियंटच्या रेंजबद्दल दावा करत आहे की ती 206 किमी आणि 307 किमीची रेंज देते.
Oben Rorr Electric Bike
Oben Rorr इलेक्ट्रिक बाईक सध्या ही बाईक फक्त भारतातील 7 राज्यांमध्ये डिलव्हर केली जात आहे. 2023 च्या पहिल्या तिमाहीत त्याची डिलिव्हरी सुरू होईल असे निर्माता कंपनीचे म्हणणे आहे. या बाईकमध्ये 4.4 kWh पॉवरफुल बॅटरी पॅक आणि 200 किमीची रेंज आहे.
Matter Electric Bike
मॅटर इलेक्ट्रिक बाइक ही अहमदाबादमधील स्टार्टअप कंपनी आहे. आजकाल त्याची खूप चर्चा आहे. त्याचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे ही एक गियर मोटरसायकल आहे. सध्या त्याचे नावही ठरलेले नाही. त्याचं बुकिंगही या वर्षी लवकरच सुरू होणार आहे.
Honda Electric bike
होंडा इलेक्ट्रिक बाईक या वर्षी जागतिक स्तरावर लॉन्च केली जाऊ शकते. याबाबत अद्याप कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही. यात कोणते फिचर्स असणार आहेत याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
Tork Motors Electric Bike
ही बाईक प्रथमच 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केली जाईल. ही Kratos मोटरसायकलची नवीन व्हर्जन असू शकते. सध्या Kratos बाजारात त्याचे 2 इलेक्ट्रॉनिक व्हेरियंट विकत आहे. यामध्ये स्टँडर्ड आणि आर मॉडेल्सचा समावेश आहे.
हे पण वाचा :- Surya Gochar 2023: शनीच्या राशीत येणार सूर्य ! आता 30 दिवस ‘या’ 4 राशींच्या लोकांना भासणार नाही पैशांची कमतरता