Electric Car :पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.
अशातच तुम्हाला इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे का? जर होय, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्वस्त दरात ई-कार खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे. सरकार ई-कारांच्या विक्रीलाही प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवरील अवलंबित्वही कमी होणार आहे.
एसबीआयने ग्राहकांना ग्रीन कार लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला SBI ने याबाबत एक ट्विट केले होते. यामध्ये ग्रीन कार लोनबाबत सांगितले होते. ग्रीन कार योजनेंतर्गत 7.25 ते 7.60 टक्के व्याजदर आहे. ही योजना 15 मेपासून सुरू झाली आहे.
ग्राहक या योजनेंतर्गत कर्ज घेऊ शकतात आणि ते 3 ते 8 वर्षांत परत करू शकतात. 21 ते 67 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या कर्जासाठी अर्ज करू शकते. देशातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांसाठी विविध श्रेणी निश्चित केल्या आहेत.
पहिल्या श्रेणीत पीएसयूचे कर्मचारी, संरक्षण कर्मचारी, पॅरा मिलिटरी इंडिया कॉस्ट गार्डचे लोक येतील. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान उत्पन्न 3 लाख रुपये असण्याची अट ठेवण्यात आली आहे. SBI निव्वळ मासिक पगाराच्या 48 पट कर्ज देऊ शकते.
दुसऱ्या वर्गात व्यावसायिक, स्वयंरोजगार, व्यावसायिक, जे आयकर रिटर्न भरतात. त्यांच्यासाठीही वार्षिक 3 लाख रुपये उत्पन्नाची अट ठेवण्यात आली आहे. त्यांना एकूण करपात्र उत्पन्नाच्या 4 पट कर्जाची रक्कम दिली जाऊ शकते.
तिसऱ्या श्रेणीत अशा लोकांना ठेवण्यात आले आहे. जे शेती किंवा संबंधित कामांशी संबंधित आहेत. अशा लोकांचे वार्षिक उत्पन्न किमान 4 लाख रुपये असावे. कर्जाची कमाल रक्कम निव्वळ वार्षिक उत्पन्नाच्या 3 पट असू शकते.