Electric Car : तुम्ही देखील येणाऱ्या काळात तुमच्यासाठी नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही येथे तुम्हाला अशा इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही फक्त 2 हजार रुपयात बुकिंग करू शकतात.
आम्ही येथे स्टार्टअप कंपनी पर्सनल मोबिलिटी व्हेइकल्स (PMV) च्या नवीन इलेक्ट्रिक कारबद्दल बोलत आहोत. ज्याची एक्स-शोरूम किंमत 4.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीकडून सध्या ही इलेक्ट्रिक कार सर्वात स्वस्त असल्याचा दावा केला जात आहे.

इलेक्ट्रिक कारमध्ये विशेष फीचर्स उपलब्ध असतील
PMV ची ही इलेक्ट्रिक कार खास सिटी राईडसाठी तयार करण्यात आली आहे. EaS-E पूर्ण चार्ज केल्यावर 160 किमीची रेंज देईल. यात समोर आणि मागे प्रत्येकी एक सीट आहे. कारमध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टीम, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एसी, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि एअरबॅग्स तसेच सीट बेल्ट यांसारखी फीचर्स मिळतील.
तसेच, कारमध्ये वेगवेगळे राइडिंग मोड्स, पाय-फ्री ड्रायव्हिंग मिळेल. , कनेक्टेड स्मार्टफोन स्मार्टफोनवरून ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, संगीत नियंत्रण आणि कॉल नियंत्रण फीचर्स उपलब्ध असतील.

2 हजारात बुकिंग करता येईल
तुम्हालाही बुक करायचं असेल तर ते फक्त 2000 रुपयांमध्ये करता येईल. उर्वरित रक्कम कार डिलीवरीच्या वेळी भरावी लागेल. तुम्हालाही कार खरेदी करायचे असेल तर कंपनीने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. जर तुम्ही वाहनाच्या सुरुवातीच्या 10,000 बुकिंगमध्ये सहभागी झालात तर तुम्हाला कार फक्त 4.79 लाख रुपयांमध्ये मिळेल. पण जर तुमचे बुकिंग 10 हजारांनंतरच्या संख्येत असेल तर तुम्हाला कारसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. पीएमव्हीने सांगितले की, आतापर्यंत 6 हजार कारचे बुकिंग झाले आहे. EaS-E साठी एकूण बुकिंगमध्ये भारतीय आणि परदेशी ग्राहकांचाही समावेश आहे.
तुम्हालाही इलेक्ट्रिक कार बुक करायची असेल तर या स्टेप्स फॉलो करा
कंपनीच्या अधिकृत वेबसाइट pmvelectric.com वर जा
प्री ऑर्डर बुकिंगच्या पर्यायावर क्लिक करा
यानंतर एक फॉर्म उघडेल
फॉर्ममध्ये तपशील भरा

नंतर प्री-बुकिंग वर क्लिक करा
पेमेंट पर्याय उघडतील
पैसे देऊन कार बुक करा
हे पण वाचा :- Fifa World Cup 2022: छोटे कपडे, दारू आणि सेक्स.. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये ‘हे’ आहे विचित्र नियम













