Electric Cars News : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. अनेक कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये (Electric Cars) अग्रगण्य यश मिळवले आहे. तसेच बाजारात टाटा मोटर्स (Tata Motors) आणि हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) या दोन कंपन्यांची सध्या क्रेझ सुरु आहे.
भारताचे ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्र वेगाने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात बदलत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की गेल्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तिप्पटीहून अधिक वाढ झाली आहे.
फेडरेशन ऑफ डीलर्स असोसिएशन (FADA) या वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या आकडेवारीनुसार, देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या किरकोळ विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. आकडेवारी दर्शवते की इलेक्ट्रिक वाहनांच्या किरकोळ विक्रीत तीन पटीने वाढ झाली आहे.
यामध्ये दुचाकींची विक्री सर्वाधिक झाली आहे. FADA ने म्हटले आहे की 2021-22 मध्ये एकूण इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 4,29,217 युनिट्सवर पोहोचली आहे, जी आर्थिक वर्ष 2020-21 मधील 1,34,821 युनिट्सपेक्षा तिप्पट आहे. 2019-20 मध्ये एकूण इलेक्ट्रिक विक्री 1,68,300 युनिट्स होती.
टाटा मोटर्स टॉप वर
FADA ने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण दिले की देशांतर्गत वाहनांमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे. टाटा मोटर्सने या कालावधीत 15,198 मोटारींची विक्री केली आहे. या विक्रीसह, त्याचा बाजार हिस्सा 85.37 टक्क्यांवर गेला आहे. कंपनीने 2020-21 मध्ये 3,523 युनिट्सची विक्री केली होती.
या बाबतीत एमजी मोटर इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. एमजी मोटर इंडियाने 2,045 युनिट्सच्या विक्रीसह 11.49 टक्के बाजारपेठ काबीज केली आहे. 2020-21 मध्ये कंपनीने 1,115 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली.
156 युनिट्ससह महिंद्रा अँड महिंद्रा त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर एमजी मोटर इंडिया आणि चौथ्या क्रमांकावर ह्युंदाई मोटर आहे. Hyundai Motor ने या कालावधीत 128 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली.
दुचाकी विक्री
FADA ने दुचाकींच्या विक्रीचे आकडेही जाहीर केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक दुचाकींची किरकोळ विक्री २,३१,३३८ इतकी होती. हा आकडा 2020-21 मधील 41,046 युनिट्सपेक्षा पाचपट जास्त आहे.
हिरो इलेक्ट्रिक आघाडीवर
दुचाकी विक्रीत हिरो इलेक्ट्रिक आघाडीवर आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत 65,303 युनिट्सच्या विक्रीसह 28.23 टक्के हिस्सा मिळवला आहे. दुसरा क्रमांक ओकिनावा ऑटोटेकचा होता. ओकिनावाने गेल्या वर्षी 46,447 युनिट्स विकल्या.
24,648 युनिट्सच्या विक्रीसह अँपिअर व्हेइकल्सने तिसरे स्थान पटकावले आहे. Hero MotoCorp ची Ather Energy 19,971 इलेक्ट्रिक दुचाकी विकली आणि चौथ्या स्थानावर राहिली. ओला इलेक्ट्रिक 14,371 वाहनांच्या विक्रीसह सहाव्या स्थानावर आहे आणि 9,458 वाहनांच्या विक्रीसह TVS मोटर सातव्या स्थानावर आहे.
FADA ने सांगितले की, गेल्या वर्षी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची विक्री वाढून 1,77,874 युनिट्स झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षात 88,391 युनिट्स होती. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांची विक्री 400 युनिट्सवरून 2,203 युनिट्सपर्यंत वाढली आहे.
फेडरेशन ऑफ डीलर्स असोसिएशन- FADA ने 1,605 पैकी 1,397 प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (RTOs) इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर हा डेटा गोळा केला आहे.