Electric Cars News : सध्या बाजारात अनेक कंपन्यांच्या ई-कार उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्यामुळे पसंती देईला लोक टाळाटाळ करत आहेत. मात्र रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ई कार घेणाऱ्यांसाठी आनंदाची माहिती दिली आहे.
पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Disel) वाढत्या किमतींमध्ये तुम्हीही इलेक्ट्रिक कार (Electric Car) (ई-कार) घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी प्रतीक्षा करा, कारण लवकरच ई-कारची किंमत खूपच कमी होणार आहे. अशी माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

ते म्हणाले की, तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेमध्ये झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमती कमी होतील. येत्या दोन वर्षांत त्यांची किंमत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीची असेल.
मंगळवारी लोकसभेत ‘2022-23 या आर्थिक वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाची मागणी’ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, किफायतशीर आणि स्वदेशी इंधनावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
भविष्यात लवकरच अशा इंधनावर वाहने धावतील आणि देशातील प्रदूषणाची पातळी कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हायड्रोजन हे सर्वात स्वस्त इंधन असेल
गडकरींनी खासदारांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील सांडपाणी वापरून ग्रीन हायड्रोजन (Green hydrogen) निर्मितीसाठी पुढाकार घेण्यास सांगितले. ते म्हणाले की, हायड्रोजन हे लवकरच सर्वात स्वस्त पर्यायी इंधन असेल.
जास्तीत जास्त दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील आणि त्यांची किंमत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने असेल.
10 पट कमी खर्च
गडकरी म्हणाले, “मी असे म्हणू शकतो की जास्तीत जास्त दोन वर्षांत इलेक्ट्रिक स्कूटर, कार आणि ऑटोरिक्षा पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर, कार आणि ऑटोरिक्षांच्या बरोबरीने वाढतील.
लिथियम-आयन बॅटरीच्या किमती सातत्याने खाली येत आहेत. आम्ही झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन आणि सोडियम-आयन बॅटरी विकसित करण्यावरही काम करत आहोत.
यामुळे तुमचा वाहनांवरील खर्च 10 पटीने कमी होईल. जर तुम्ही आज पेट्रोलवर 100 रुपये खर्च करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रिक वाहनावर 10 रुपये खर्च कराल.
आता किंमत खूप जास्त आहे
सध्या, टाटा, एमजी आणि टोयोटा सारख्या कार कंपन्या भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कारची विक्री करतात. मात्र, सध्या या गाड्यांची किंमत खूपच जास्त आहे. Tata Tigore EV ची किंमत रु. 12.25 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
दुसरीकडे, टाटाची लोकप्रिय कार Nexon EV ची किंमत 14.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. सध्या भारतात विकल्या जाणार्या बहुतेक प्रवासी कारपेक्षा ही किंमत खूप जास्त आहे. जर त्यांची किंमत कमी झाली तर ते खूप किफायतशीर होतील आणि त्यांची विक्री वाढेल अशी अपेक्षा आहे.













