Electric Scooter : आजच घरी आणा ‘ही’ कमी किमतीत जबरदस्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, पहा संपूर्ण डिटेल्स

Published on -

Electric Scooter : देशात अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करू लागले आहेत. परंतु मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती खूप जास्त आहेत. परंतु आता तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका.

कारण तुम्ही कमी बजेटमध्ये Okaya Faast F2B ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. यात कंपनीने उत्तम फीचर्स दिले आहेत. तसेच 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शानदार स्कुटरची बॅटरी 3 वर्षांपर्यंतच्या वॉरंटीसह येते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कंपनीची ही स्कूटर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करता येईल. जाणून घेऊयात Okaya Faast F2B चे फीचर्स आणि किंमत.

जाणून घ्या ओकाया फास्ट F2B चे फीचर्स

ओकाया फास्ट F2B च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर स्कुटर 2500 वॅट BLDC मोटरद्वारे समर्थित असून यात 2.16 Kwh बॅटरी देण्यात आली आहे, जी चार्ज होण्यासाठी एकूण 3-4 तासांचा कालावधी घेते. याच्या रेंजबद्दल बोलताना, कंपनीचा असा दावा आहे की एकदा चार्ज केल्यानंतर ते 80-85 किमी अंतर कापण्यास सक्षम असून स्कुटरची बॅटरी 3 वर्षांपर्यंतच्या वॉरंटीसह तुम्हाला मिळेल.

इतकेच नाही तर ओकाया फास्ट एफ2बी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टीम, डिजिटल ओडोमीटर आणि डिजिटल स्पीडोमीटर यासारखी इतर शानदार फीचर्स देण्यात आली आहेत.

जाणून घ्या Okaya Fast F2B ची किंमत

किमतीचा विचार केला तर Okaya Fast F2B ची भारतीय बाजारातील किंमत 99,950 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. हे लक्षात घ्या की स्कुटर केवळ एकाच प्रकारात येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ही शानदार इलेक्ट्रिक स्कूटर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरूनही खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला ही स्कूटर कमी किमतीत खरेदी करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe