Elon Musk : ट्विटर विकत घेतल्यापासून नवीन मालक एलोन मस्क हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. सध्या ते एका कारणामुळे चर्चेत आले आहेत.
ॲपल आणि सॅमसंगला टक्कर देण्यासाठी एलोन मस्क भारतीय बाजारात उतरणार आहेत. लवकरच ते आपला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे.

ॲपल, गुगल आणि सॅमसंगसारख्या दिग्ग्ज कंपन्यांशी लवकरच इलॉन मस्क बाजारात उतरणार आहे. याबाबत मस्क यांनी ट्विट केले होते.
I certainly hope it does not come to that, but, yes, if there is no other choice, I will make an alternative phone
— Elon Musk (@elonmusk) November 25, 2022
“मला नक्कीच आशा आहे की ते तसे होणार नाही, परंतु होय, जर दुसरा पर्याय नसेल तर मी पर्यायी फोन करेन” असे मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सध्या ते स्पेस ट्रॅव्हल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिक वाहने आणि सोशल मीडिया यांसारखे व्यवसाय हाताळत आहेत. मस्क हे येत्या काही काळात स्मार्टफोन तयार करण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
या ॲपल आणि गुगलबाबत सांगायचे झाले तर या दोन्ही स्मार्टफोनने ऑपरेटिंग सिस्टममध्ये बराच काळ कब्जा केला आहे. जवळपास 15 वर्षांपासून, मार्केटमध्ये Android आणि iOS फोनची ऑपरेटिंग सिस्टम म्हणून राज्य करत आहेत.