Employee Paternity Leave 2023 : ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आता मिळणार 12 आठवड्यांची सुट्टी ; अशा प्रकारे घ्या लाभ

Ahilyanagarlive24 office
Published:

Employee Paternity Leave 2023 : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात हजारो पुरुष कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Pfizer India या कंपनीने मोठा निर्णय घेत आपल्या पुरुष कर्मचाऱ्यांना वडील झाल्यावर 12 आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची घोषणा केली आहे.

या घोषणांमुळे आता याचा फायदा कंपनीच्या हजारो पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याच बरोबर मूल दत्तक घेतल्यानंतरही कर्मचाऱ्यांना या सुट्टीचा लाभ घेता येणार आहे. कंपनीच्या या पॉलिसीमध्ये जे कर्मचारी पिता बनतील त्यांना 2 वर्षांच्या आत या सुट्ट्यांचा लाभ घेता येईल. एकावेळी कमीत कमी दोन आठवडे आणि जास्तीत जास्त सहा आठवड्यांची रजा घेण्याची सुविधा आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो आतापर्यंत महिला कर्मचाऱ्यांना मातृत्व रजा म्हणजेच आई झाल्यावर प्रसूती रजा दिली जात होती. ही रजा 26 आठवडे म्हणजे सुमारे 6 महिन्यांसाठी आहे. पण आता वडील बनणाऱ्या पुरुषांनाही तीन महिन्यांची रजा मिळणार असून ती पितृत्व रजेच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहे. कंपनीने सर्वसमावेशक दृष्टिकोनातून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीचे हे नवीन धोरण जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आले आहे.

अशा प्रकारे तुम्हाला 12 आठवड्यांची रजा मिळेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Pfizer India आपल्या पुरुष कर्मचार्‍यांना पिता बनल्यानंतर 12 आठवड्यांची पितृत्व रजा देणार आहे, वडील झाल्यानंतर कर्मचारी 2 वर्षांच्या आत या सुट्ट्या वापरू शकतात. जर एखाद्या कर्मचाऱ्याने पितृत्व रजा घेतली तर त्याला एका वेळी किमान दोन आठवडे ते जास्तीत जास्त 6 आठवड्यांची रजा दिली जाऊ शकते. हे नवीन धोरण 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आले आहे. जैविक पित्यांबरोबरच, दत्तक पिता देखील या पॉलिसी अंतर्गत सुमारे 3 महिन्यांची पितृत्व रजा घेऊ शकतात.

हे पण वाचा :- Team India: टीव्हीचा ‘हा’ फ्लॉप स्टार ठरवणार कोहली आणि रोहितचं भविष्य ! BCCI अचानक घेतला मोठा निर्णय 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe