Good News : देशात दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness allowance) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महागाई भत्त्यापाठोपाठ (DA) केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) वाढवू शकते. अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी (Central Staff) सरकारच्या या निर्णयाची वाट पाहत आहेत.
वास्तविक, सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार अडीच पटीने वाढतात. त्याआधारे सुधारित मूळ वेतन जुन्या मूळ वेतनातून मोजले जाते.
गेल्या वेळी 2017 मध्ये एंट्री लेव्हल बेसिक पे 7000 रुपयांवरून 18000 रुपये प्रति महिना करण्यात आला होता. 2022 मध्ये त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर, लेव्हल मॅट्रिक्स 1 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26,000 रुपयांपासून सुरू होईल.
वास्तविक, सध्या केंद्रीय कर्मचार्यांचे फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे आणि मूळ किमान वेतन 18000 आणि कमाल पगार 56000 आहे. मूळ वेतनात वाढ व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मागणी केली जात आहे.
याबाबत अनेकवेळा निवेदनही दिले आहे.आगामी निवडणुकांपूर्वी मोदी सरकार (Modi Govt) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर विचार करू शकते. फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.
सहमती झाल्यास मूळ वेतनात 8000 ने वाढ होईल आणि बेसिक पगार 18000 वरून 26000 पर्यंत वाढेल. केंद्रातील मोदी सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांना 49000 ते 96000 पर्यंत पगारात लाभ मिळेल.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आहे, या आधारावर किमान मूळ वेतन 18000 रुपये आणि कमाल मूळ वेतन 56900 रुपये आहे. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल, तर भत्ते वगळून त्याचा पगार 18,000 X 2.57 = 46,260 रुपये नफा असेल.
3.68 वर, पगार 95,680 रुपये (26000 X 3.68 = 95,680) म्हणजेच पगार 49,420 रुपये होईल. याचा फायदा 52 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल.