तिसगाव ग्रामपंचायत मालकीच्या अनेक मोकळ्या जागांवर अतिक्रमण … जागा बळकावण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ग्रामपंचायत मालकीच्या अनेक मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून त्या अगदी पद्धतशीर बळकावण्याचा प्रयत्न गावातील तसेच बाहेर गावातील लोकांकडून सुरू आहे.

एका ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याने त्याची चौकशी होऊन अतिक्रमण करणाऱ्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप सर्जेराव पाथरे यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तिसगाव ग्रामपंचायत मालकीच्या जागा काही सदस्यांनी ताब्यात घेत लाखो रुपयांच्या जागा फूकटात मिळवल्या तर काही नेतेमंडळींनी ग्रामपंचायतच्या जागांवर स्वतः कब्जा न करता त्या इतरांना वाटल्या. याप्रकरणी पाथरे यांनी ग्रामपंचायत,

जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन दहा दिवसात अनधिकृतपणे अतिक्रमण करणाऱ्या सदस्यवर कारवाई न झाल्यास दिनांक १७ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा पाथरे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe