Maharashtra news : श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. तेथे आता एक दिवस पुरेल एवढेच पेट्रोल शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होण्याची भीती आहे.
पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ट्विटरवरून देशात फक्त एकच दिवस पुरेल इतकं पेट्रोल शिल्लक असल्याचे नागरिकांना कळविले आहे.यामुळे पेट्रोलसाठी लंकेत नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या असून वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेला सध्या परकीय चलन साठ्यात ७.५ कोटी डॉलरची गरज आहे. त्यातून जीवनावश्यक गोष्टी परदेशातून खरेदी करता येतील. भारताकडून मिळालेल्या क्रेडिट लाइनचा वापर करून पेट्रोल आणि डिझेल दोन जहाजामधून येत आहे.
त्यामुळे पुढचे काही दिवस दिलासा मिळेल.नागरिकांनी पेट्रोल पंपाववर लांब रांगा लावू नयेत. देशात एकच दिवस पुरेल इतकं पेट्रोल शिल्लक असून पुढचा काळ हा सर्वात कठीण काळापैकी असणार आहे. आपल्याला काही त्याग करण्याची आणि आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायला हवे असंही पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.