EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने आपल्या करोडो ग्राहकांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. ग्राहकाचा अनेकवेळा दावा नाकारला जात होता.
त्याशिवाय त्यांना कोणतेही कारण सांगितले जात नव्हते. परंतु, आता या ग्राहकांना त्यांचा दावा नाकारण्याचे कारण सांगण्याचा आदेश EPFO ने दिला आहे.
या लोकांना होणार फायदा
ईपीएफओच्या नवीन आदेशामुळे ईपीएफच्या पैशासाठी दावा करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे, ग्राहकांना आता EPF दावा का नाकारला गेला आहे की नाही हे पहिल्याच क्षणी समजणार आहे.तुम्ही दुरुस्त्या करून पुन्हा अर्ज करू शकता, त्यामुळे क्लेम सेटलमेंटमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
काही जणांसोबत अनेक वेळा असे होते की ज्यावेळी सदस्य ईपीएफ दाव्यासाठी अर्ज करतात त्यावेळी त्यांना नकाराचा सामना करावा लागतो. त्याबाबत त्यांना कोणतीच माहिती देत नाहीत.
परंतु,आता ईपीएफओच्या नवीन आदेशानंतर दावा नाकारण्याचे कारण सांगावे लागेल. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, दावा मान्य केल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे दावे निकाली काढण्यास उशीर होत आहे.