EPFO Update : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 66 हजार रुपये

Ahmednagarlive24 office
Published:

EPFO Update : कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता केंद्र सरकारकडून कोणत्याही दिवशी पीएफ कर्मचार्‍यांच्या खात्यात व्याजाचे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा कोट्यवधी अधिक लोकांना होणार आहे.

यावेळी सरकारकडून 8.15 टक्के व्याज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात 66 हजार रुपये जमा होणार आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून कर्मचारी याची वाट पाहत होते. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

दरम्यान 2022-23 या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना 8.15 टक्के व्याजाचा लाभ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु केंद्र सरकारकडून अजूनही अधिकृतपणे व्याजाची रक्कम जमा करण्याची घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये 15 जूनपर्यंतचा दावा केला जात आहेत.

मिळणार इतके व्याज

केंद्र सरकारकडून कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीनंतर यावेळी वाढीव व्याज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारकडून यावेळी पीएफ कर्मचाऱ्यांना 8.15 टक्के व्याज दिले जाणार आहे. हे लक्षात घ्या की यापूर्वी आर्थिक वर्षात 8.1 टक्के व्याज देण्याची घोषणा सरकारने केली होती.

वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या युगात व्याजाची ही रक्कम बुस्टर डोसपेक्षा कमी नसणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यात किती रक्कम येणार? असे वेगवेगळे प्रश्न पडले असणार. जर तुम्हालाही याबाबत माहिती नसेल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

खात्यात येणार हजारो रुपये

समजा कर्मचाऱ्यांच्या खात्यात 6 लाख रुपये जमा केल्यास 8.15 टक्के व्याजानुसार त्यांच्या खात्यात एकूण 50,000 रुपये ट्रान्सफर केले जाणार असे सांगण्यात येत आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यात 8 लाख रुपये असतील तर तर 8.15 टक्के दराने 66 हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe