EPFO Update : NPS, EPFO, ESIC शी संबंधित धक्कादायक माहिती आली समोर, मंत्रालयाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर

Ahmednagarlive24 office
Published:

EPFO Update : ईपीएफओ (EPFO), ईएसआयसी (ESIC), एनपीएसशी (NPS) संबंधित माहिती समोर आली आहे. जुलै महिन्याची तुलना केली तर ऑगस्टमध्ये नवीन सदस्यांमध्ये कमालीची घट झाली आहे.

याबाबत मंत्रालयाने (Ministry) अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीमुळे (Ministry Official statistics) सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

EPFO शी संबंधित आकडेवारीत घट

अधिकृत आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2022 मध्ये EPFO ​​अंतर्गत एकूण 9,86,850 नवीन सदस्यांची (EPFO members) नोंदणी झाली होती, जी जुलै 2022 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या 11,19,698 सदस्यांपेक्षा 11.86 टक्के कमी होती.
आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2022 पर्यंत, एकूण 5,81,56,630 नवीन सदस्य EPF योजनेत सामील झाले.

त्याचप्रमाणे, ESIC अंतर्गत, ऑगस्टमध्ये नवीन सदस्यांची संख्या 14,62,145 होती, जी जुलैमध्ये नोंदणी केलेल्या 15,89,364 सदस्यांपेक्षा 8 टक्के कमी होती.

मंत्रालयाने अधिकृत आकडेवारी जाहीर केली

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2022 दरम्यान ESIC मध्ये 7,22,92,232 नवीन सदस्य जोडले गेले. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये नवीन NPS सदस्यांमध्येही थोडीशी घट झाली आहे.

ऑगस्टमध्ये, नवीन NPS (NPS members) सदस्यांची एकूण संख्या 65,543 होती, जी जुलैमध्ये नोंदणी केलेल्या 66,014 सदस्यांपेक्षा 0.71 टक्के कमी होती.

आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2022 दरम्यान NPS अंतर्गत 37,85,101 नवीन सदस्यांची नोंदणी झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe