EPFO Update : नोकरी करणाऱ्या लोकांना सतत त्यांच्या पीएफविषयी काळजी असते. जमा होणारे पैसे परत मिळणार की नाही असे वेगवेगळे प्रश्न असतात. दरम्यान असे अनेक कर्मचारी आहेत की यामध्ये मिळणाऱ्या पेन्शनबाबत त्यांना कसलीच कल्पना नसते.
या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर महिन्याला पेन्शन म्हणून 15,670 रुपये देण्यात येत आहेत. समजा तुमची नोकरी 9 वर्ष 6 महिन्यापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला पीएफसह पेन्शनची रक्कम काढता येत नाही. काय आहे संपूर्ण गणित जाणून घ्या.
संसदेत EPF कायदा मंजूर झाल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची स्थापना झाली. कायद्यानुसार, कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनी UAN नावाच्या कायमस्वरूपी खात्यात टाकण्यात आलेल्या पैशाची जबाबदारी EFPO कडे असते. EPF कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला आता तुमच्या बचतीचे प्रभावीपणे मूल्यांकन करता येते.
मिळते पैशाची हमी
भविष्यातील आर्थिक निर्णय घेण्यासाठी भविष्य निर्वाह निधी फायद्याचा असून यामुळे भविष्यातील समृद्धीची किंवा नोकरी गमावल्यास पैशाची हमी मिळते.
EPF प्रणालीमध्ये समाविष्ट असणारे कर्मचारी त्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12% निश्चित रकमेचे योगदान देत असतात. त्यानंतर, नियोक्ता समान 12% योगदान देत असून ज्यापैकी 8.33% EPS आणि 3.67% कर्मचाऱ्याच्या EPF खात्यात जाते. हे लक्षात ठेवा की नियोक्त्याने ईपीएफ योजनेत समान योगदान द्यावे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्थ मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतर, EPFO सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज EPF व्याजदर ठरवत असते. आर्थिक वर्ष 2022-2023 साठी, EPF व्याज दर 8.15% वर सेट करण्यात आला आहे.
असे असते ईपीएफ कॅल्क्युलेटरचे काम
उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार महागाई भत्त्यासह 1,00,000 रुपये इतका आहे. त्याच्या EPF मध्ये कर्मचाऱ्याचे योगदान 12% म्हणजेच 12,000 इतके असून आता, नियोक्ता योगदान 3.67% म्हणजे 3,670 आणि नियोक्ता EPS मध्ये योगदान देत असून जे 40,000 च्या 8.33% आहे, जे 8,330 पर्यंत काम करते.
कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात नियोक्ता तसेच कर्मचारी यांचे एकूण योगदान 15,670 रुपये इतके असते. प्रत्येक महिन्यासाठी लागू व्याजदर 8.15%/12 = 0.679% असणार आहे. तसेच, प्रत्येक महिन्यासाठी एकूण योगदान 15,670 रुपये इतके येते.