सर्वोच्च न्यायालयात दोन घटनापीठांची स्थापना, चालविणार ही प्रकरणे

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News: सर्वोच्च न्यायालयात आज प्रत्येकी पाच न्यायमूर्तींच्या दोन घटनापीठांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याकडे देशात गाजलेली आठ प्रकरणे सोपविण्यात आली आहेत.

यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या खटल्याचा मात्र समावेश नाही. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी ही घटनापीठे स्थापन केली आहेत.

आर्थिकदृष्ट्या (EWS) आरक्षणाची वैधता, मुस्लिमांना आरक्षण, मुस्लिमांमधील बहुविवाह पद्धती, सर्वोच्च न्यायालयाच देशात इतरत्र खंडपीठ स्थापन करण्याची मागणी,अशा खटल्यांचे कामकाज या घटनापीठांकडे सोपविण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe